भोर ! अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत संताप : सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे बाबत खालच्या पातळीवर जात वादग्रस्त केलेल्या वक्तव्याचे भोर शहरात तीव्र पडसाद उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांच्या विरोध विरोधात घोषणाबाजी करीत वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला व भोर पोलिसांना निवेदन दिले.
             सत्तार यांची २४ तासांच्या आत मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली.यावेळी तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा बँक माजी संचालक भालचंद्र जगताप,माजी समिती सदस्य विक्रम खुटवड,मानसिंग धुमाळ, युवकाध्यक्ष गणेश खुटवड,बाळासाहेब पारठे, गणेश निगडे,मनोज खोपडे ,विलास राऊत ,केतन चव्हाण ,पार्थ रावळ आदींसह शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top