सातारा ! फुलांची उधळण व रांगोळीच्या पायघड्या घालतनातीचं स्वागत : अंगापूर येथील भोईटे कुटुंबाचा समाजापुढे आदर्श

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सातारा : गजानन हगवणे
समाजात कायम दुय्यम स्थान मिळणाऱ्या स्त्रीचा जन्म होताच तिला गर्भातच संपवण्याच्या अनेक घटना ऐकायला व‌‌ पाहायला मिळत आहेत, मात्र सातारा तालुक्यातील अंगापुर येथील बाळासाहेब भोइटे परिवाराने बेटी बचाव बेटी पढाव ही उक्ती सार्थ करत सोमवारी (दि.७ रोजी ) नातीचे फुलांची उधळण व रांगोळीच्या पायघड्या घालून आनंदोत्सव साजरा करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे .
"चूल आणि मूल " एवढ्यापुरती मर्यादित ठेवून स्त्रियांना कायम दुय्यम  स्थान दिले गेले आहे . स्त्रीगर्भ  असल्याचे समजताच गर्भातच तिला संपवण्याच्या अनेक घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडत आहेत ,पण या व्यवस्थेला फाटा देऊन  सैन्य दलात (आर्मी ) पंजाब लुथियाना येथे कार्यरत  भारत मातेची सेवा करत असलेल्या सातारा अंगापूर येथील जवान गणेश भोइटे यांनी आपल्या लेकीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे .

जुनेखेड (ता वाळवा)येथील कृर्षी आधिकारी संजय तोडकर व अनिता तोडकर यांची कन्या व सातारा, अंगापुर येथील बाळासाहेब भोइटे यांच्या सुनबाई भाग्यश्री  यांनी  इस्लामपूर येथील एका खाजगी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला .मुलीच्या जन्मानंतर भोइटे व तोडकर परिवाराने स्त्रीजन्माचे स्वागत केले .समाजातील प्रत्येकाने स्त्रीजन्माचे स्वागत करावे ,यासाठी अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला . पण सुनबाई भाग्यश्री व नातीसह माहेरी होत्या , नुकतेच नातीचे " गार्गी " नामकरण झाले तदनंतर त्या अंगापुर ( सातारा ) येथील घरी येणार होत्या, त्यामुळे घरात आंनदाचे वातावरण होते. लहान थोरांसह सर्वजण मुलीच्या स्वागताची तयारी करण्यात मग्न होते . नात  व सुन येणार असल्याने सणाप्रमाणेच धावपळ होती . प्रत्येक जण घरामध्ये सर्वत्र सजावट करून फुगे व फुलांचे तोरण बांधून स्वागताची तयारी करत होते. मुलीच्या जन्मानंतर सुन भाग्यश्री चे नात गार्गी सह अंगापूर येथे आगमन झाले . भोइटे परिवारातर्फे आजोबा बाळासाहेब , आजी स्वातीताई , व अनिता ,चुलते रोहन, आत्या व मामी रोहिणी, मामा अभिजीत अदिनी फुलाच्या पाकळ्याची उधळण करत, तोरण , फुगे बाधुन आतिषबाजी करून स्वागत केले.  एवढ्यावर न थांबता चिमुकल्या नातीचे कूकूं वात पायाचे ठसे उमटवुन सुुन व नातीचे पांरपारिक पद्धतीने आजी स्वातीताई भोइटे यांनी औक्षण केले . घराच्या प्रवेशदारात धान्याची रास ओलाडून  गृहप्रवेश देण्यात आला . घरामध्ये मुलींच्या नावाने गाणे लावत या मायलेकींचे स्वागत करून फटाक्यांची आतीषबाजी करत दिवाळी साजरी केली. सैन्य दलात परिवारा पासुन दूर राहत भारतमातेची सेवा बजावत असणार्‍ या गणेश भोईटे व रोहन भोइटे या बंधुनी आपल्या लेकीच्या जन्मानंतर घरप्रवेशा दरम्यान केलेल्या पांरपारिक अनोख्या स्वागत सोहळ्याने... सुख म्हणजे काय असत " यांची प्रचिती पहावयास मिळाली आहे त्यांच्या या स्वागत सोहळ्याचे परिसरातून कौतूक होत आहे
To Top