सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मागील एक वर्षभरात सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत आमूलाग्र बदल केल्यामुळे सर्व शाखेत विद्यार्थी संख्या वाढली आहे. संशोधक वाढावे म्हणून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन घेतले. तसेच महिलादिनी महिलांचा सन्मान करून एक वेगळा पायंडा सुरू केला. ऊसाचे अधिकाधिक हार्वेस्टिंग मिळावे व ऊसतोडणी कामगार उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न केले. भविष्यात कारखान्याचे सर्व कामकाज पेपरलेस होण्याच्या दृष्टीने पायाभरणी केली असल्याचे मत सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी व्यक्त केले.
वर्षभरातील केलेल्या कामकाजाचा आढावा श्री होळकर यांनी घेतला.त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, कारखान्यातील कामकाजात अंतर्गत अनेक बदल केले गेले. उपाध्यक्षांच्या केबिनमध्ये बसून कारखान्यातील सर्व माहिती मिळू लागली आहे. गोडाऊन मधील साखर किती शिल्लक आहे, रोजचा किती ऊस आला, कुठल्या गटातून किती आला, एकूण गाळप, साखर पोती, साखर उतारा, कुठल्या व्यापाऱ्याने किती साखर उचलली, डिस्टलरी, वीज प्रकल्प यांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. कारखाना पेपरलेस करण्याच्या दृष्टीने या वर्षभरात पाहिले पाऊल टाकले गेले.
आपल्या कारखान्यातील सद्याचे कॉम्प्युटर मधील सॉफ्टवेअर पाच वर्षे जुने आहे. ते अपडेट करणे भविष्यात गरजेचे आहे. त्यामुळे कारखान्यातील माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. राज्यातील सह्याद्री कारखाना, राजारामबापू कारखाना, शंकरराव मोहिते पाटील कारखाना व विघ्नहार कारखान्यावर ही यंत्रणा कार्यांवित आहे. कारखान्याच्या स्टोअर मधून अजूनही कागदावर व्यवहार चालतात. याबाबत ही ऑनलाईन माहिती उपलब्ध होणे गरजेचे आहे. याबाबत अनेक कारखान्यावर जाऊन सविस्तर माहिती घेतली. बाहेरील कारखान्यात जाऊन माहिती घेतल्याने आता अपलेला काय खरेदी करायचे आणि आणि ते कुठे कुठे बसवायचे याची पूर्ण माहिती मिळाली आहे. प्रोसिडिंग सुद्धा संचालकांना टॅब वर दिसले पाहिजे. या सर्व बाबींमधून लवकरच कारखाना पेपरलेस होण्यास मदत होईल. ऑनलाईन बाबतीत अधिकाऱ्यांमध्ये नकारात्मकता दिसून येत आहे. मात्र काळानुसार बदल होणे गरजेचे आहे.
प्रवासाबाबत आनंदकुमार होळकर यांनी वर्षभरात केलेल्या प्रवासाबाबची आकडेवारी त्यांनी पत्रकारांपुढे मांडत याबाबत आपण हे सर्व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना ते माहितीसत्व पाठवली आहे. हा प्रवास करताना कारखान्याच्या हितासाठी लागणारा प्रवास केला असून यामध्ये राज्यातील कारखाने, साखर संकुल, राहुरी कृषी विद्यापीठ, ऊसतोडणी यंत्रणा, तसेच शिक्षण संस्थेच्या पुणे विद्यापीठ यासाठीच हा प्रवास झाला असून गाडीचा खर्च रेग्युलर झाल्याचे होळकर यांनी स्पष्ट केले.
शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेबाबाबत कॅप जमिनी या सॉफ्टवेअर कंपनीकडून महाविद्यालयासाठी ५० संगणक मिळाले आहेत. शिक्षण संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार केले जात आहेत. सायन्स, इंजिनिअरिंग महाविद्यालयाची पहिल्यांदाच प्रवेश क्षमता पूर्ण भरली आहे. विद्यापीठ समिती व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी महाविद्यालयात वेगवेगळे इव्हेंट होणे गरजेचे आहे. त्यातूनच वेगळे विद्यार्थी तयार होणार आहेत. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे पब्लिक स्कुल मध्ये १०० प्रवेश, एमबीए मध्ये ६०, इंजिनिअरिंग महाविद्यालयात २४०, डिप्लोमा २१,
संगणक विभाग ६०ची मर्यादा १२० केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विश्वास टाकत कारखान्याचे उपाध्यक्षपद दिले याबाबत होळकर यांनी खा. शरद पवार, ना. अजित पवार, खा.सुप्रिया सुळे यांच्यासह अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सर्व संचालक व सभासद यांचे आभार मानले.