वाई ! 'किसनवीर' कारखान्याचा गुरुवारी गळीत हंगाम शुभारंभ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२-२३ चा ५२ वा गळीत हंगामाचा शुभारंभ गुरूवार (दि.१०) दुपारी १ वाजता विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते व वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे आमदार, किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
          किसन वीर कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ नुकताच झालेला असून कारखान्यातील सर्व कामेही झालेली असून कारखाना गळीत करण्यासाठी सज्ज झालेला आहे. किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाचे गळीतही सध्या पुर्ण क्षमतेने सुरू आहे. किसन वीर साखर कारखाना सुरू होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या असल्याची माहितीही प्रसिद्धपत्रकात श्री. शिंदे यांनी दिलेली आहे.
         किसन वीर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, प्र. कार्यकारी संचालक अशोक शिंदे, कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.
To Top