मेढा ! ओंकार साखरे ! वेण्णा नदीतुन दगडी गोट्यांची चोरी मेढा पोलिसांत एकावर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
मेढा - केळघर येथिल स्मशान भुमी जवळून  वेण्णा नदीतुन दगड गोटे चोरून नेत असताना आढळून आलेल्या सचिन विष्णू बिरामणे वय- 36 वर्षे रा. केळघर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती पोलीस ठाण्यातुन मिळाली आहे.
          दि. 7 रोजी सायंकाळी मेढा पोलीस स्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक अमोल माने व पोलीस कॉन्स्टेबल पद्मसेन घोरपडे हे सायंकाळी पेट्रोलिंग करत असताना केळघर येथील स्मशान भूमीजवळ पोहोचल्यावर नदीपात्रातून ट्रॅक्टरचा आवाज येत असल्याचे जाणवले. नदीपात्रातून ट्रॅक्टर ट्रॉली मेढा केळघर रस्त्यावर आली असता चालकाकडे चौकशी केली तेव्हा त्याच्याकडे गौनखनिज उत्खननाचा तसेच वाहतुकीचा परवाना तसेच लिलावाची पावती आढळून आली नाही.
             ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये सुमारे 2500 रुपये किमतीचे गौनखनिज त्यातील अंदाजे अर्धा ब्रास किमतीचे दगडगोटे तसेच 5,00,000 रुपये किमतीचा लाल रंगाचा डी आय ट्रॅक्टर 575 त्यावर आर टी ओ नंबर प्लेट नसलेला त्यासोबत दोन चाकी डम्पिंग ट्रॉली त्यावर आर टी ओ नंबर नसलेला आढळून आला मालमत्ता ताब्यात घेवुन सचिन विष्णू बिरामणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा.पो.नि. अमोल माने यांचे मार्गदर्शना खाली नितीन जाधव हे तपास करीत आहेत.
To Top