बारामती ! मंत्रिमंडळात ठराव करून राज्यपालांना परत पाठवा : बारामती तालुका मराठा सेवा संघाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग केश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आणि राज्यात एकच वादन निर्माण झालेला पाहायला मिळालं. "शिवाजी महाराष्ट्र पुराने जमाने के आदर्श है", असं वक्तव्य राज्यपालांनी केले आणि पुन्हा महाराष्ट्राचा राज्याचा रोष राज्यपालांनी उडवून घेतला. 
            राज्यभर   त्यांच्या विरोध आंदोलन करण्यात येत आहेत. बारामती तालुका मराठा सेवा संघ जिजाऊ भवन, यांच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यपाल केसरी यांना महाराष्ट्रातून परत पाठवण्यासाठी मंत्रिमंडळात ठराव करावा या मागणीचे पत्र बारामती चे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, यांना देण्यात आले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, छत्रपती शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्राचे दैवत असून,आमची अस्मिता , स्वाभिमान आहेत, अख्खे जग त्यांच्या युद्धनीती व गनिमी काव्याचा अभ्यास करून कौतुक करत आहे. १८ पगड जाती जमातींना बरोबर घेऊन त्यांनी रयतेसाठी स्वराज्य उभे केले अशा आमच्या स्वाभिमानावर राज्यपाल कोश्यारी हा प्रत्येक वेळी बेताल वक्तव्ये करत आहे. नेहमी एकरी शब्दात उल्लेख करीत आहे. महाराष्ट्राचा अपमान करीत आहे. त्यामुळे केश्यारी ला महाराष्ट्रातून बाहेर करावे.व त्यांना माफी मागायला लावावी यापुढे जर राज्यपाल केश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल अपशब्द वापरले तर त्यांचे विरुद्ध तमाम बहुजन समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल.असे तालुका मराठा सेवा संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
          यावेळी प्रदीप शिंदे, देवेंद्र शिर्के, विजय तावरे, दीपक बागल, प्रदीप धापटे, राकेश सावंत, राजेंद्र खराडे, संभाजी माने, प्रमोद पानसरे, तुषार निगडे, अमोल चांदगुडे, हेमलता परकाळे, अनिता गायकवाड, नलिनी पवार, अनेक महिला व तरूण उपस्थित होते.
To Top