सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील वीसगाव खोऱ्यातील नेरे ता.भोर येथे रामचंद्र श्रीपती उल्हाळकर यांच्या रहात्या घराला अचानक मंगळवार दि.२२ पहाटेची वेळी आग लागून पूर्ण घर संसार जळून खाक झाला.आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे कारण कळू शकले नाही.
रामचंद्र उल्हाळकर यांचे घर बंद असल्याने जीवित हानी टळली असली तरी घरातील धान्य,कपडे,संसार उपयोगी वस्तू तसेच मिरची कांडप यंत्र आगीत पूणपणे खाक झाले.पहाटे घराला आग लागल्याचे निदर्शनास येताच स्थानिक तरुणांनी भोर नगर परिषदेच्या अग्निशमन दलास पाचारण केले.तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली.तर महावितरणच्या अधिकारी ,कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज खंडित केल्याने पुढील धोका टळला.नुकसानग्रस्त रामचंद्र उल्हाळकर यांना त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी वीसगाव खोरे परिसरातील नागरिकांकडून होत आहे.