धरण उशाला...कोरड घशाला... अस्तरीकरणाचा फटका...! काम चालू झाल्याने शेती पिके जळाली... तर पाणीपुरवठा योजना गुटक्यावर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण झाले पाहिजे हा बारामतीच्या पूर्वेकडील शेतकऱ्यांचा सूर होता... तर अस्तरीकरण नाही झाले पाहिजे हा बारामतीपासून पश्चिमेकडील  शेतकऱ्यांचा सुरू होता. अखेर होय नाही करता करता अखेर काम सुरू झालंच आहे. 
          सद्या नीरा डाव्या काळव्यावरील फाटा नीरा ते वडगाव दरम्यान अस्तरीकणाचे काम सुरू असून त्यासाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद ठेवले आहे. त्यामुळे मात्र आता शेती पिकाला पाण्याची कमतरता जाणवू लागली असून कालव्यालगतच्या विहिरींना तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीनी याचा फटका बसला आहे. अनेक गावांमधून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. नीरा खोऱ्यातील बागायत पट्ट्यात धरण उशाला आणि कोरड घशाला अशी नागरिकांची अवस्था झाली आहे. 
            दोन महिन्यांपूर्वी बारामती व इंदापूरच्या अनेक गावांमधून नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरण बाबत आंदोलने झाली. मात्र शेतकाऱ्यांच्यात एकजूट नसल्याने काहींचा सुरू अस्तरीकरणाच्या बाजूने होता तर काहींचा सूर अस्तरीकरण विरोधात होता. दोन्ही शेतकऱ्यांच्यात समझोता करण्यासाठी बारामती येथे पाटबंधारे खात्याने मीटिंग चे आयोजन केले होते. मात्र अस्तरीकरणाला पाठिंबा देणारे व विरोध करणारे शेतकरी आमनेसामने आल्याने गोंधळ उडाला होता.
To Top