सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती तसेच बाल दिनानिमित्त बाल आनंद मेळाव्याचे आयोजन एकात्मिक बाल विकास प्रकल्पात अंतर्गत करण्यात आले होते. या मेळाव्यात चिमुकल्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पाडला.
कार्यक्रम प्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सह गटविकास अधिकारी विजय धनवटे व बाल विकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर तसेच विस्तार अधिकारी सुनील शेटे यांच्या हस्ते करण्यात आले.तर चिमुकल्यांना खाऊ वाटप करून बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन नेरे व आंबवडे बिटने केले होते.यावेळी पर्यवेक्षिका विद्या सोनवणे ,राजश्री जाधव, संगीता जाधवर, प्रज्ञा भागवत ,अंगणवाडी सेविका राजश्री चिकने,सोनाली थोपटे,छाया बांदल,वैशाली भोसले, महानंदा जेधे,सुनिता पारठे,सुवर्णा चौधरी,आशा सुतार, कीर्ती शिर्के,सुनिता चव्हाणआदींसह शेकडो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.