सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील वरवडी बुद्रुक ता.भोर येथील बहुतांशी विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत.पुढील काळात वरवडी बुद्रुकचा सर्वांगीण विकास हाच ध्यास मनी धरून काम करणार असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी केले.
वरवडी बुद्रुक येथे १३ नोव्हेंबरला २ कोटी १४ लाख रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करताना शिवतरे बोलत होते. यात प्रामुख्याने समाज मंदिर, सर्वेश्वर मंदिर सभा मंडप व अंतर्गत रस्ते ही विकास कामे आहेत.यावेळी तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे ,संदीप नांगरे ,मनोज खोपडे, विलास वरे ,रघुनाथ भोसले, सचिन पाटणे, लक्ष्मण म्हस्के, अरुण वरे,सरपंच सुनीता तुपे ,उपसरपंच आनंदा तुपे, रघुनाथ तुपे, गणेश तुपे ,प्रशांत तुपे ,तानाजी तुपे आदींसह वीसगाव खोऱ्यातील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवतरे पुढे म्हणाले वरवडी बुद्रुक येथील मतदारांनी मागील पंचवार्षिकला जे भरभरून मतदान केले होते. त्याचे उत्तरदायित्व पार पाडत असून उर्वरित विकास कामांची पूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून माझी राहील.