भोर-आंबाडे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत भेकराचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
 भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील भोर -आंबाडे रस्त्यावर भाबवडी ता.भोर येथे मंगळवार दि.१४ पहाटेच्या वेळी एका मादी जातीच्या भेकरास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती वनविभागास सरपंच अमर बुदगुडे यांनी तात्काळ दिल्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचून त्या मृत भेकरास ताब्यात घेण्यात आले.
    मृत भेकराचे भोर येथील पशू चिकित्सालय येथे शविच्छेदन करून वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी संदीप खट्टे तसेच वनरक्षक पांडुरंग गुट्टे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय भाटघर (भोर)आवारात अग्निदहन केले.

To Top