वाई बिग ब्रेकींग ! दौलतराव पिसाळ ! वाई शहरात तळीरामांचा धुडगूस : तब्बल पंधरा चारचाकी वाहने फोडली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
वाई शहरात मध्य रात्रीच्या सुमारास वाहनांची झालेल्या  मोडतोडीची पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी गंभीर दखल घेऊन त्या अज्ञात माथेफिरु टोळीचा शोध घेण्या साठी वाई शहरात  पोलिस त्या  त्या विभागातील सीसीटिव्ही तपासणीचे काम पोलिस पथकाने युध्द पातळी वर सकाळी सहा वाजल्या पासून  सुरु केले आहे .
          नागरिकांनी घाबरुन जावु नये आरोपी लवकरच गजाआड करण्यात आम्हाला यश येईल अशी माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिली आहे. घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की वाई   शहरात रविवार पेठ राम डोह आळी, ब्राम्हणशाही आदी ठिकाणी घराबाहेर लावलेल्या वाहनांची मोडतोड तळीराम अथवा अज्ञात माथेफिरु व्यक्तीने केल्याचे वाई शहरात  रात्रगस्ती वर असलेल्या पोलिसांच्या हि बाब निदर्शनास येताच तेव्हा पासून पोलिस त्या माथेफिरुचा शोध गोपनीय पध्दतीने  घेण्याचे काम युध्द पातळीवर करताना दिसत आहेत   .
 नागरिका मध्ये भीतीचे वातावरण असून नेमका कोणी हा  प्रकार केला असावा याची चर्चा वाईच्या चौका चौकात सुरु आहे   वाई शहरात प्रथमच असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अंदाजे १० ते १५   वाहनांच्या काचा फुटल्याचे दिसुन  येत आहे, 
         वाई शहरात  नागरिकांची वाहने रात्री घरासमोर लावलेली असतात. त्याच वाहनाच्या काचा फुटल्याचे सकाळी नागरिकांना दृष्टीस पडले. त्यात ओमीनी, स्विफ्ट, अल्टो अशा कारच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे नेमका कोणी हा प्रकार केला असावा, या परिसरात सीसीटीव्ही असून त्यात हा प्रकार कैद झाला असावा अशी ही शक्यता व्यक्त होत आहे. वाई शहरात यापूर्वी कधी ही असा प्रकार घडला नव्हता मात्र मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फोडलेल्या वाहनांच्या काचामुळे कार चालकांचे मोठे नुकसान झाले आहे .
To Top