फलटण ! प्रतिनिधी : स्वराज रणवरे ! फलटणसह माळशिरस तालुक्यात एजंटांची ‘अशी ही फसवाफसवी’ : ऑनलाईन ट्रेडिंगच्या मायाजालातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
फलटण : स्वराज रणवरे
फलटणसह माळशीरस तालुक्यातील नातेपुते परिसरात सध्या आॅनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू आहे.  फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर आॅनलाईन ट्रेडिंग करणाऱ्या एजंटांची एक गुप्त बैठक झाली असून, या बैठकीत सोशल मीडियावर ट्रेडिंगबाबत कोणतीही माहिती पसरवू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते.
         माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरात आॅनलाईन ट्रेडिंगद्वारे कोट्यवधी   रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे आढळून येत आहे. या ट्रेडिंगचे लोन आता फलटण तालुक्यातही पसरू लागले आहे. फलटण तालुक्यातील नामांकित कंपन्यांमधील अधिकारी व कर्मचाºयांनी पगारावर कर्ज काढून तो पैसा आॅनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही वर्षांपूर्वी शेअर मार्केट, क्रिप्टो करन्सी यामधील काही कंपन्या कोट्यवधींची उलाढाल करून बंद पडल्या होत्या. यातील काही एजंट आता शेअर मार्केट, क्रिप्टो करन्सी संचालक पदावर काम करत आहेत. अशा लोकांमुळे अनेक गोरगरीब कुटुंबाची घरे उवस्त झाली आहेत. समाजातील अनेक कुटुंबांनी कष्टाचा पैसा एजंटच्या स्वाधीन केल्याने आर्थिक संसाराचा गाडा कोलमडला पाहायला मिळत आहे. फलटण तालुक्यातील आॅनलाईन ट्रेडिंग फसवणुकीच्या प्रकाराला वाचा फुटल्यानंतर एजंटांच्या पायाखालची वाळू सरकली असून, नागरिकही आता सतर्क झाले आहे. मात्र, त्यांनी पैसा गुंतवूनही तो परत न मिळाल्याने अनेकांवर पश्चातापाची वेळ आली आहे.
-------------------
‘माया’ गोळा करण्याचा प्रकार...
‘लोकमत’ने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर माळशिरस परिसरात एजंटाची बैठक पार पडली. कोणत्याही एजंटने ट्रेडिंग संदर्भातील पोस्ट व अन्य माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये, अशा सूचना या बैठकीत एजंटांना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास गुंतवणूकदारांना पैसे परत करावे लागतीत, अशी चर्चा सुरू झाली असून, आॅनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली ‘माया’ गोळा करणाºया कंपनीचे भवितव्य धोक्यात आले आहे.
-------------------
अलिशान हॉटेलमध्ये कार्यक्रम घेऊन भुरळ
ठेवीदारांच्या पैशातून आलिशान हॉटेलमध्ये कार्यक्रम घेऊन लोकांना भुरळ घातली जात आहे. काही गोरगरीब शेतकरी या भुलथापांना बळी पडतात. अनेकांनी तर शेती विकून लाखो रुपये एजंटच्या घशात घातले आहेत. इतकेच नव्हे तर शिक्षक, अधिकारी, कंपनीतील कर्मचाºयांनी देखील लाखोंची गुंतवणूक केली आहे.
---------------------
सध्या क्रिप्टो करन्सीवर शासनाकडून कायदेशीर ३० टक्के कर आकारण्यात आला आहे. लोकांनी तज्ञांकडून क्रिप्टो करंसीचा सल्ला घेऊन पैशांची गुंतवणूक करावी. गुंतवणूकदारांचा फायदा होईल असे नाही. तोटा देखील होऊ शकतो.
- निखिल भोईटे, चार्टर्ड अकौंटंट, फलटण
To Top