सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जेजुरी : प्रतिनिधी
जेजुरी नजीक असणाऱ्या आय एस एम टी कंपनीत काल सकाळी सहाच्या दरम्यान लोखंडाचा रस वाहून नेणाऱ्या लँडलची साखळी (वायर रोप ) तुटल्याने वितळलेला लोहरस अंगावर पडून ८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. मोरगाव रोडवर आय एस एम टी ही कंपनी लोखंडी रॉड, सळई बनवण्याचे काम करते. कंपनीत बॉयलर मध्ये १६५० १८०० डिग्री सेल्सिअसला लोखंड वितळवून लोहरस बनवला जातो- याच लोहरसापासून वेगवेगळ्या आकाराचे रॉड व सळ बनवल्या जातात.
अपघातात क्रेन चालक जितेंद्र सिंग, सुजित विलास बरकडे (वय २५), चुनेज भानुदास बरकडे (वय २२), अनकुमार सिन्हा (वय ५२ ) आकाश यादव (वय २२) दुर्गा यादव (वय ४०) शिवाजी राठोड (वय ३८) मनोरंजन दास (वय ३५) यांच्या अंगावर वितळत्या लोखंडाचा रस पडल्याने जखमी झाले आहेत. यातील चार जण गंभीर जखमी असून, क्रेन चालक जितेंद्र सिंग याला पुणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
COMMENTS