सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथील नीरा बाजार समितीचे संचालक सुखदेव शिंदे यांनी स्वतःच्या शेतातील मकेचं तीन टन पीक गुजराथी गिर गाईंसाठी दिले.
चौधरवाडी येथील सुखदेव शिंदे हे गेले अनेक दिवसांपासून सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. सद्या लम्पि आजाराने जनावरे बेजार झाली असताना त्यांना हिरवा चारा मिळाला पाहिजे या हेतूने शिंदे यांनी तीन टन मकेचं पीक गुजराथी गिर जनावरांसाठी दिले.
---------------
सुखदेव शिंदे-चौधरवाडी : गुजरात येथील गिर गायी गेले अनेक वर्षांपासून सोमेश्वर कारखान्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या जनावरांना रोज हिरवा चारा मिळत असतो पण गिर गायींना वर्षभर वाळल्या पाचोल्यावर दिवस काढावे लागतात. त्यांनाही हिरवा चारा मिळावा याउद्देशाने ही मदत केली.