सोमेश्वर रिपोर्टर टीम--- -
भोर : संतोष म्हस्के छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अक्षपार्य वक्तव्य केल्याबद्दल भोर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध भोर येथील शिवतीर्थ असणाऱ्या शिवाजी महाराज स्मारक चौपाटी येथे शिवसैनिक व पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच भाजपाचे खासदार सुधांशू त्रिवेदी,आमदार गोपीचंद पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक शब्द वापरले होते.त्याचाच निषेध भोर तालुका शिवसेनेच्या वतीने घोषणाबाजी करून करण्यात आला.यावेळी भोर तालुका शिवसेनाप्रमुख हनुमंत कंक, आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर ,दशरथ पिलाणे ,शंकर पडवळ ,सचिन चुनाडी, कुणाल मालुसरे, मयूर म्हस्के ,प्रशांत वीर ,शिवाजी पोळ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.