वाई पोलिसांच्या ऐकीच्या बळावरच आरोपींची धरपकड मोहीम यशस्वी ! बाळासाहेब भरणे

Admin
3 minute read
 सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ  
वाई शहरासह वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील  नागरीकांवर विविध प्रकारचे न्यायालयात गुन्हे दाखल आहेत. विविध गुन्ह्यातील आरोपी हे न्यायालयाने नेमून दिलेल्या तारखांना सदैव गैरहजर राहुन न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत होते  हि बाब  न्यायालयाच्या लक्षात आल्याने न्यायालयाने अशा सर्व आरोपींची यादी तयार करुन थेट पकड  वारंट काढुन आरोपी पकडुन न्यायालयात हजर करण्याची जबाबदारी वाई पोलिस ठाण्यावर सोपवली होती .  
         न्यायालयाच्या या आदेशाची तातडीने  अंमल बजावणी करण्या साठी वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे सहाय्यक पोलिस निरिक्षक रवींद्र तेलतुमडे या जोडीने पोलिस ठाण्यातील सहकारी अधिकारी व पोलिस कर्मचारी यांची सोमवार  दि.२७ रोजी सायंकाळी  बैठक घेवुन पकट वारंट कशा पद्धतीने बजवायचे व यातील एकही आरोपी सुटता कामा नये या साठी घ्यावयाची काळजी बाबत  सखोल मार्गदर्शन करुन हि  मोहीम मंगळवार  दि.२९ च्या पहाटे पाच वाजल्या पासून सुरु करण्याचे आदेश दिले होते .    
वाईच्या न्यायालयाने सतत न्यायाधिश साहेबांन समोर गैरहजर राहणार्या तब्बल ३० आरोपींची पकड वारंटची यादी बाळासाहेब भरणे यांनी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणी पोलिस कर्मचारी यांच्या ताब्यात दिली .
  हि पकड वारंटची यादी वाई पोलिस ठाण्याचे अधिकारी आणी सर्व  पोलिस कर्मचारी यांच्या ताब्यात येताच मंगळवारी पहाटे पाच वाजल्या पासून धरपकड करण्यास सुरुवात केल्याने सतत न्यायाधिशान समोर गैरहजर राहणार्या ३० आरोपीन पैकी ५ मयत आहेत तर २४ आरोपी पकडुन न्यायालयात वाई पोलिस अधिकारी आणी पोलिस कर्मचारी वर्गाने हजर करून हि पकड वारंटची अंमलबजावणी चोख करुन सतत गैरहजर राहणार्या आरोपींना चांगलाच धडा शिकविल्याने वाई शहरासह वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या ग्रामीण भागातील नागरीकांन मध्ये खळबळ उडाल्याचे चित्र दिसुन आले .हि मोहीम यशस्वी केल्याने पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे सहाय्यक पोलिस निरिक्षक रवींद्र तेलतुमडे यांनी सर्व पोलिस  अधिकारी आणी पोलीस कर्मचारी वर्गाचे कौतुक केले आहे .वाईचे पोलिस अधिकारी आणी पोलिस कर्मचारी यांच्या ऐकीच्या ताकती मुळेच अशा मोहीमा यशस्वी करता येतात . अशा ऐकीच्या बळामुळेच वाई पोलीस ठाण्याची आणी पोलिसांची प्रतिमा  उज्वल यशाच्या उंबरठ्यावर डौलाने ऊभी आहे असेही बाळासाहेब भरणे म्हणाले .
To Top