सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन २२ चा कार्यक्रम जाहीर केला असून दि १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बारामती तालुक्यात एकूण १३ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.
मोरगाव, वाघळवाडी, पणदरे, मुरुम, वाणेवाडी, गरदडवाडी, सोरटेवाडी, कुरणेवाडी, सोनकसवाडी, काऱ्हाटी, लोणी भापकर, मासाळवाडी व पळशी अशा एकूण १३ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तहसिल कार्यालय, बारामती येथे नामनिर्देशन फॉर्म दाखल करता येतील. हे फॉर्मस ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे लागणार आहेत.
------------------
दि २८ नोव्हेंबर सरपंच सदस्य
मोरगाव २ १
वाघळवाडी ४ ०
पणदरे २ ३
--------------------
दि २९ नोव्हेंबर सरपंच सदस्य
मोरगाव १ ४
पणदरे ५ १०
सोनकसवाडी १ १
लोणीभापकर १ १
पळशी २ ३
वाघळवाडी १ २
मुरूम ० २
वाणेवाडी ० २
गडदरवाडी २ ४
सोरटेवाडी ० १