भोर ! शहरात आठवे फुले, शाहू,आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन सुरू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर येथे फुले,शाहू ,आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, अनंतराव थोपटे महाविद्यालय ,अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,महाराष्ट्र साहित्य परिषद ,श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठान तसेच समविचारी संस्था व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहूराज स्मृतीशताब्दीच्या पार्श्वभूमीवर ८ वे फुले,शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन शनिवार दि.२६ सुरू झाले.आमदार संग्राम थोपटे हस्ते ध्वजारोहण करून संमेलनास प्रारंभ करण्यात आला.
      शहरातील एसटी स्टँडवरील संविधान शिल्प ते संमेलन स्थळापर्यंत संविधान रॅली काढण्यात आली. यावेळी उद्घाटक झी २४ तास चे मुख्य संपादक निलेश खरे,तहसीलदार सचिन पाटील,पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे,गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे - केळकर संयोजन समिती अध्यक्ष भुजंगराव दाभाडे,कार्याध्यक्ष रोहिदास जाधव,कोषाध्यक्ष ज्ञानोबा घोणे,सहसचिव आनंदा गायकवाड,राजन घोडेकर,सल्लागार डॉ.प्रदीप पाटील ,प्राचार्य प्रसन्नकुमार देशमुख,महेंद्र साळुंके,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर तसेच संविधान दिनामित्त विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
To Top