सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : प्रतिनिधी : धनंजय गोरे
जावली तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनेवाडी गावातील हनुमान मंदिराचे जीर्णोद्धारचे काम हनुमान मंदिर निर्माण समिती व ग्रामस्थ मंडळ आनेवाडी यांच्या वतीने करण्यात आले असून शनिमंदिर लिंब, गोवे येथील प पू महंत श्री योगेंद्रगिरी गुरु बटुकगिरी महाराज यांचे हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम सोमवारी संपन्न होत असून, यावेळी साताराचे खासदार श्रीनिवास पाटील, जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जावलीच्या माजी सभापती जयश्री गिरी, सुहासदादा गिरी, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार, माजी अर्थ व शिक्षण सभापती अमित कदम, जावलीचे माजी उपसभापती व प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे या लोकप्रतिनिधीच्या हस्ते हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहोळा याच दिवशी संपन्न होत आहे
रविवार दिनांक 27/11/2022 रोजी दुपारी 12 वाजता हनुमान मूर्तीला कृष्णा नदी तीरी जलाभिषेक व तदनंतर 2 ते 5 भव्य मिरवणूक व सायंकाळी 5 ते 7 हनुमान मूर्ती लेपण होणार असून सोमवार दिनांक 28/11/2022 रोजी सकाळी 6 ते 9 वास्तुशांती व होमहवन सकाळी 10 ते 12 मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण दुपारी 1 ते 4 भजन सायंकाळी 4 ते 8 महाप्रसाद अशी कार्यक्रम रूपरेषा असून या धार्मिक कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन हनुमान मंदिर निर्माण समिती व ग्रामस्थ मंडळ आनेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.