प्रतिनिधी ! संतोष म्हस्के ! भोरच्या साक्षीची बारामतीत दंगल ! काकडे महाविद्यालयात भरवण्यात आलेल्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातील नियमित व्यायाम,स्वतःवरील विश्वास तसेच मनोबलाच्या जोरावर विद्यार्थी घडत असतात.साक्षी भिलारे (वरोडी ता.भोर )याच धर्तीवर नियमित व्यायाम व मनोबल राखून कुस्ती क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करत आली असून तालुक्यात ती कुस्ती खेळात अव्वल असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
      अनंतराव थोपटे महाविद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी सुभाष भिलारे हीने एम.एस. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर ता.बारामती  येथे झालेल्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत ५० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला.तिची आखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरावर कुस्ती स्पर्धेत निवड झाली. त्याबद्दल पै.साक्षी हीचा सत्कार व अभिनंदन करताना आमदार थोपटे बोलत होते.यावेळी प्राचार्य डॉ.प्रसन्नकुमार देशमुख, कला व वाणिज्य विभाग प्रमुख डाॅ.एल. ए.अवघडे, एनसिसी विभाग प्रमुख डाॅ.संदीप उल्हाळकर,  शारीरिक शिक्षण संचालक डाॅ.संजय वाडकर आदी उपस्थित होते.
To Top