वाई ! बाळासाहेब जयसिंगराव नाईक निंबाळकर यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
वाई तालुक्यातील ओझर्डे गावचे ज्येष्ठ नागरिक  आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व माजी वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून सेवा निवृत्त झालेले प्रगतीशील शेतकरी  बाळासाहेब जयसिंगराव नाईक निंबाळकर ( गुरुजी) यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धाप काळाने त्यांचे  दुःखद निधन झाले वाई तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात  ते बापू या नावाने सर्वांना परिचित होते त्यांच्या निधनाची बातमी समजताच  ओझर्डे गावासह संपुर्ण वाई तालुक्यातील   शैक्षण क्षेत्रात  हळहळ व्यक्त केली जात आहे .
           त्यांची  वाई तालुक्यात आदर्श शिक्षक आणी प्रगतीशील शेतकरी म्हणूनवेगळी ओळख होती. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले ज्ञानदानाचे ऊल्लेखनीय कामाची जिल्हापरिषदेने दखल घेऊन त्यांना वाई तालुका स्तरावरचा  आदर्श शिक्षक पुरस्कार देवून  सन्मानित करण्यात आले होते  . त्यांची  शिक्षक म्हणून पुणे जिल्ह्यातून  सुरुवात झाली . वाई तालुक्यां मध्ये त्यांची सर्वात जास्त सेवा झाली ,शिस्त , प्रामाणिक पणा, सचोटी, नियमांशी बांधिलकी व  शिक्षकांच्या अडचणीच्या काळात  कायम पाठीशी राहणारे असाही त्यांचा नावलौकिक व दराराही होता .त्यांनी त्यांच्या आयुष्यात  असंख्य  आदर्श विद्यार्थी घडविण्या  साठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने त्यांचे  विद्यार्थी  मोठ मोठ्या पदांनवर नोकरीला आहेत .
         वाई तालुक्यातील  पांडे ,खानापूर येथील ग्रामस्थांच्या आग्रहाखातर  या गावांन मध्ये   त्यांनी सर्वात जास्त सेवा बजावली   पांडे हे गाव शैक्षणिक प्रगतीचे बनावे त्याच बरोबर येथील ग्रामस्थांना स्वताचे    कुटुंब मानुन त्यांनी  आपली   सेवा बजावली .शासकीय नियमावली नुसार ते भोगाव ता.वाई  या शाळेतुन  वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून ते   सेवा निवृत्त झाले . अशा या आदर्श शिक्षक आणी प्रगतीशील शेतकर्याचे दुःखद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे . त्यांच्या पक्षात दोन मुले तीन मुली सुना   नातवंडे  असा परिवार आहे .
        निधनाची बातमी समजताच ओझर्डे गावातील ग्रामस्थ सहकारी संस्था विकास सेवा  सोसायटीसह वाई तालुक्यातील  सामाजिक शैक्षणिक राजकीय सहकार  क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने बापुंना अखेरची  भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
To Top