सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत ता बारामती येथे पठार वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या चारी मध्ये एका ४० वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला असून मयताच्या डोक्याला मार लागला असून कानातून रक्त येत असल्याने हा अपघात की घातपात याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
केंजा कठीण काळे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी वडगाव निंबाळकर पोलीस दाखल झाले आहेत.