सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जेजुरी : प्रतिनिधी
जेजुरी औद्योगिक वसाहतीतील इंडियाना कंपनी ग्रुपचे व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ते,ग्रामदेवता जानाईदेवीचे मानकरी शेखर आप्पासाहेब बारभाई यांना कै दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
शेखर बारभाई हे जेजुरी येथील रहिवाशी असून जेजुरी एमआयडीसीतील इंडियाना कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कंपनीच्या माध्यमातून अनेक स्थानिक तरुणांना रोजगार ,कोरोना काळात जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला संगणक संच,जनरेटर, मार्तंड कोरोना केअर सेन्ट्ररला २ लक्ष रुपये निधी ,जेजुरी देवसंस्थानला महाशिवरात्र उत्सवासाठी लोखंडी जिना, विविध शाळांना मुलींसाठी शौचालये,पिण्याचे पाणी, जेजुरी शहरासाठी वैकुंठ रथ आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच थोर समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर पदाधिकारी म्हणून यापूर्वी त्यांनी काम पहिले आहे. त्यांच्या या उलेखनीय कार्याबद्दल जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जेजुरी उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य संजय सावंत, सदानंद चेरिटेबल ट्रस्टचे गणेश आबनावे, जेजुरी देवसंस्थानचे माजी विश्वस्त नितीन राउत,शाहीर सगनभाऊ रंगमंचाचे कार्याध्यक्ष उन्मेष बारभाई आदी उपस्थित होते.
या पुरस्कारा बद्दल जेजुरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिलीपदादा बारभाई, नगरसेवक जयदीप बारभाई तसेच जेजुरी उद्योजक संघाच्या वतीने शेखर बारभाई यांचे अभिनंदन करण्यात आले.