सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोल्हापूर : प्रतिनिधी
'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव यांचा कोल्हापुर येथे अपघाती मृत्यु झाला आहे.
कोल्हापुर सांगली महामार्गावरील हालोंडजवळ डंपरने दिलेल्या धडकेत कल्याणी यांचा मृत्यु झाला. या दुर्घटनेनंतर कलाक्षेत्रातील तिच्या अनेक सहकलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. कल्याणी यांनी अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे त्या घराघरात लोकप्रिय झाल्या होत्या. कल्याणी या मुळच्या कोल्हापुरचीच होत्या.