मेढा ! ओंकार साखरे ! दारूमुक्त जावली तालुक्यात दारू मिळतेच कशी ? जनतेचा सवाल....पोलीसांच्या कारवाईवर शंका, एसपींच्या कारवाईचे जनतेकडून स्वागत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे      
सातारा जिल्ह्याला मिळालेले धडाकेबाज जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांचे जावली तालुक्यातुन स्वागत होत असताना दारू मुक्त जावली तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू मिळेत कशी असा प्रश्न सामान्य जनतेला पडला असुन आज पर्यत अवैध धंदे पोलीसांच्या आशिर्वादाने सुरु होते काय अशी शंका घेतली जात आहे  तर या अवैध धंद्याबाबत प्रसार माध्यमांना दुर का ठेवल जात आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
              जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी जिल्ह्याची सुत्रे स्विकारल्या पासुन अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु केले आहे. या प्रामाणिक प्रयत्नांचे सर्वसामान्य जनते कडून कौतुक होताना दिसत आहे. 
          जावली तालुका हा दारूमुक्त तालुका होण्यासाठी व्यसनमुक्त चळवळीचे विलासबाबा जवळ, त्यांचे कार्यकर्ते तसेच अनेक महिला यांनी प्रत्यत्न केले. अनेक चळवळी, अंदोलने यासाठी करावी लागली. वेळप्रसंगी ग्रामसभा होवुन मतदान प्रक्रिया पार पाडून उभी बाटली आवडवी झाली पण जावलीतील दारू हद्दपार झाली नाही.
            तालुक्यात छोट्या टपर्‍या असो, भाजीपाला दुकान असो कि छोटी वाहने असो अशा प्रकारे वेगवेगळ्या शकला लढवुन दारुचे अवैध धंदे सुरुच राहीले. सामाजिक संघटणांनी , नागरीकांनी , मग त्या जवळवाडीच्या माजी सरपंच वर्षाताई जवळ असतील यांनी अवैध धंदेवाल्यांना मालमत्तेसह धरून पोलीसांच्या ताब्यात दिलेले अनेकांनी पाहीले आहे. 
              पोलीसांच्या धातुरमातुर कारवाईने अवैध धंदेवाल्यांनी तेच अवैध धंदे त्याच जोमाने पुन्हा पुन्हा सुरु केले या पाठीमागे  आशिर्वाद कोणाचा मिळाला हे सांगण्याची गरज नाही. परंतु जिल्ह्याला लाभलेले जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी चालविलेली धडक कारवाई सध्या तरी जावलीकरांसाठी आनंदाची बाब आहे.
              जिल्हा पोलीस प्रमुख समिर शेख यांच्या आदेशाने अवैध धंद्या विरोधात उघडलेली मोहीम पहाता जावली तालुक्यात एवढा मोठा सापडत असल्याचे आश्चर्य वाटत असुन हे धंदे कोणत्या हेतुने सुरु ठेवले होते याचा शोध जिल्हा पोलीस प्रमुखांनी घ्यावा आणि जावलीतुन दारू , मटका , जुगार याचे समुळ उच्चाटन व्हावे अशी मागणी जावली तालुक्यातुन होत आहे. तसेच सुरु असलेले धाडसत्र गुलदस्त्यात ठेवुन प्रसार माध्यमांना दुर का ठेवले जात आहे याचाही शोध घेणे गरजेचे आहे. 
             अवैध धंद्यांबाबत कारवाई मध्ये सातत्य राहील्यास सामान्य जनतेत पोलीसा बद्दल आदर राखला जाईल. सामान्य गोरगरीब जनतेचा दुवा मिळेल.   

To Top