सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरुम(ता. बारामती) येथील श्रीमती शेवंतांबई गोपाळराव शिंदे(वय,१०५) यांचे सोमवार(दि.१४) रोजी पहाटे पाच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात् तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परीवार आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कुमार शिंदे , उद्योजक उदयसिंह शिंदे यांच्या त्या आई तर मुरुमचे माजी उपसरपंच निलेश शिंदे यांच्या त्या आजी होत. विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रात यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.