भोर ! तालुक्यातील हीर्डोस मावळ खोऱ्यात लंपीचा पहिला बळी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हीर्डोस मावळ खोऱ्यातील गोळेवाडी ता.भोर येथे लंपी आजारामुळे एका बैलाचा मृत्यू झाला असून ही तालुक्यातील पहिलच घटना आहे.तरी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी संघटनांकडून होत आहे.
   तालुक्यात मागील दोन महिन्यांपूर्वी लंपीची दोन  जनावरे आढळून आली होती. त्या जनावरांवर पशुसंवर्धन विभागाकडून उपचार सुरू केल्यानंतर जनावरे लवकरच या आजारातून बाहेर आली होती. तालुक्यात पुन्हा लंपी आजाराने डोकेवर काढले असून गोळेवाडी येथील दगडू महादू गोळे यांच्या बैलाचा लंपी आजारामुळे मृत्यू झाला आहे.या बैलावर गेली आठ दिवस उपचार देखील सुरू होते . मातृ उपचार सुरू असतानाही हा बैल दगावला असल्याची घटना घडली.या घटनेची माहिती मिळताच पंचनाम्यासाठी निगुडघरचे पशुवैध्यकीय अधिकारी डॉ .एस.व्ही.निकम, डॉ.एस.एन.कांबळे,पंचायत समिती विस्तार अधिकारी पौर्णिमा येवतीकर ,किकवी पशुधन विकास अधिकारी वेध पाठक, तसेच तलाठी बेंद्रे भाऊसाहेब व गावातील पोलीस पाटील ,सरपंच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
                                             
To Top