अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मुंबई : प्रतिनिधी  
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन झालं आहे. ते ७५ वर्षांचे होते. 
            सुनील शेंडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह अनेक हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. सुनील शेंडे घरातच चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांची सून जुईली शेंडे यांनी दिली. त्यांनी रात्री एक वाजता अखेरचा श्वास घेतला. विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे.
To Top