बारामती ! वाणेवाडीचे 'सुपुत्र' व लोणीभापकर विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप जगताप यांना कर्मवीर भाऊराव पाटील 'आदर्श' शिक्षक पुरस्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणी भापकर : प्रतिनिधी
लोणी भापकर (ता. बारामती) येथील न्यू इंग्लिश स्कुल या विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप जगताप यांना मुंबईतील सेकंडरी स्कुल्स एम्पलाईस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने 'कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार -2022' हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोसायटीकडून दरवर्षी राज्यातील निवडक प्रयोगशील माध्यमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. लोणी भापकर सारख्या अत्यन्त ग्रामीण भागातील विद्यालयात वंचित घटकातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे, शाळा डिजिटल करणे, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविणे, गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण देणे, मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडविणे याबद्दल जगताप यांची पुणे जिल्ह्यातून निवड करण्यात आली. नुकताच दादरमधील शिवाजी नाट्य मंदिरात निवृत्त प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. याप्रसंगी किशोर पाटील, सुधाकर जगदाळे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष नंदकुमार सागर, वसंत ताकवले, संगीता शिंदे, सतेश शिंदे, सीमा जगताप, उषा झणझणे उपस्थित होते. याशिवाय जगताप यांना पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने 'जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक' या पुरस्कारानेही नुकतेच गौरविण्यात आले होते. जगताप हे बारामती तालुका मुख्याध्यापक संघांचे सचिव आहेत.
विद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब भापकर, सचिव बाळकृष्ण भापकर, विजयसिंह भापकर यांनी अभिनंदन केले.
To Top