सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मेढा - दारूमुक्त जावली तालुक्यात आपल्या आदेशाने अवैध धंदया विरोधात सुरु असणारी कारवाई स्वागताहार्त असताना पोलीस मित्र संकल्पे नुसार रणरागिनी टास्क समितीची स्थापना करावी अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्याकडे महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जावली तालुक्यातील सन २००९ मध्ये ६ गावातील १३ दारु दुकाने गुरुवर्य बंडातात्या कराडकर,ॲड वर्षा देशपांडे, विलास जवळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो महिलांनी मतदाद्वारे उभी बाटली आडवी केली परंतु त्या बाबतीत पोलीसांकडून पुढे कोणतेही सातत्य ठेवले गेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा दारु च्या अवैध धंद्याला पोलीसांच्या आशिर्वादाने जोमाने सुरुवात झाली.
तालुक्यात महिलांनी अवैध धंद्या विरोधात पुन्हा अंदोलने केली वेळप्रसंगी स्वतः धाडी टाकत दारू पकडून दारूसह अरोपीला पोलीसांच्या ताब्यात दिले . परंतु तो अरोपी एवढा निर्धावलेला असायचा कि सर्व काही आपल्या खिशातच आहे अशा प्रकारे वागुन पुन्हा जोमाने धंदा सुरु करायचा.
साहेब आपण आल्या नंतर जी मोहीम हाती घेतली त्यामुळे आम्हा महिलांच्या संसारात आनंदाची किरणे आली असुन आम्हाला पाठीराखा भाऊ मिळाला असल्याची भावना झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील महिलांना या अवैध धंद्या विरोधात काहीतरी अधिकार मिळायला पाहीजेत जेणे करून आमच्याकडून झालेल्या धाडीला यश मिळेल. अजुनही एवढी मोठी कारवाई करण्याचे आदेश देवुन सुद्धा अजनही अवैध धंदे सुरुच असल्याचे व्यसनमुक्त संघटनेच्या संघटक सौ. वर्षाताई जवळ यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यामध्ये आपल्या कडून ज्याप्रमाणे पोलीस मित्र ही संकल्पना राबविण्यात येते त्याच धर्तीवर रणरागिनी टाक्स समितीची स्थापना करून महिलांना या अवैध धंद्या विरोधात लढण्याची ताकद द्यावी अशी मागणी केली आहे. रणरागिनी टाक्स समितीची स्थापना झाल्यास पोलीस ठाण्यावरील ताण कमी होईल.
जिल्हा पोलीस प्रमुख समिर शेख साहेब आपण गडचिरोली येथे केलेल्या धाडशी कामगिराने आपणास सन्मानित करण्यात आले असेच काम आपल्या हातुन सुरु राहील्यास आपली बदली झाल्यावर माहिलांच्या डोळ्यात अश्रु आल्याशिवाय राहणार नाहीत असेलही निवेदनात म्हटले आहे.
फोटो - वर्षाताई विलास जवळ संघटक, व्यसनमुक्त महिला संघ महाराष्ट्र राज्य