सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील खानापूर ग्रामपंचायतच्यावतीने १५ व्या वित्त आयोग निधीतून गावातील ६ अंगणवाडी शाळा व दोन आशा सेविका यांना कपाटे ,टेबल ,खुर्ची व प्रेशर कुकर यांचे वाटप राजगड ज्ञानपीठ संस्थेच्या सचिवा स्वरूपा संग्राम थोपटे यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी राजगडचे संचालक उत्तम थोपटे,सरपंच मंगल गायकवाड, उपसरपंच वैशाली पवार ,सदस्य रेश्मा थोपटे, आशा थोपटे,अंकुश पोळ, ग्रामसेवक रविंद्र सावंत, पोलीस पाटील राधिका रवळेकर , विकाचे चेअरमन शिवाजी थोपटे ,माजी सरपंच चंद्रकांत नांगरे ,नथू थोपटे ,सर्व आशा सेविका ,अंगणवाडी सेविका व मदतनीस आदी उपस्थित होते.
COMMENTS