सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील चौपाटी येथील शिवस्मारकासमोर त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त ११०० पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवामुळे चौपाटी परिसर उजळून निघाला होता.
रोहिडा शिवजयंती उत्सव समिती भोर यांच्या शिवस्पर्श निधितून गेली दहा वर्षे सुरू असलेला उपक्रम दर पौर्णिमा , अमावस्या सर्व सणांना श्री छञपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर चौपाटी तसेच एसटी स्टंँड समोरील श्री छञपतींची मूरर्ती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्तींना पूष्पहार अर्पण करण्यात येतो.त्याप्रमाणेच छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हजारो पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला. यावेळी बहुतांशी समिती सदस्य उपस्थित होते.
दीपोत्सव साजरा करतानाचा फोटो पाठवीत आहे.