सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदीप कोंडे यांच्यावर भादे गावच्या हद्दीत मोर्वे- वाघोशी रस्त्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात तरुणांकडून गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेत प्रसाद कोंडे यांच्यावर हल्लेखोरांकडून दोन गोळ्या झाडल्यानंतर सुरक्षा रक्षकाकडून देखील अज्ञाताना भीती दाखवण्यासाठी प्रत्युत्तरादाखल हवेत गोळीबार केल्याने हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. या घटनेत सुदैवाने कसलीच जीवित हानी झालेली नाही.
मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदिप कोंडे हे वीर येथील श्री नाथ म्हस्कोबा येथील दर्शन घेऊन मोर्वे येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपल्या गाडीतून लोणंदच्या दिशेने जात असताना भादे गावचे हद्दीत सदर घटना घडली.
COMMENTS