सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वेलंग ता वाई येथील बंद अवस्थेत मोडकळीस आलेली वादग्रस्त जिल्हा परिषदेची शाळा मूळ जागा मालकाने जमीनदोस्त केल्याने वाई तालुका वेलंग परिसरासह शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे गेली सहा महिन्या पासून शाळा इमारत धोकादायक असल्याची लेखी तक्रार वाई पंचायत समिती प्रशासन व वेलंग ग्रामपंचायत यांच्याकडे वारंवार तक्रारी केली होती.
इमारत पडल्यावर गुन्हा दाखल करण्याचा अट्टा हास करणारे सन्मानीय शाळा केंद्रप्रमुख विठ्ठल माने सहा महिने धोकादायक इमारत हटविण्यास जाणीव पूर्वक टाळाटाळ का करत होते? असा प्रश्न मूळ जागा मालक राजेंद्र जेधे यांनी उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला आहे. अनेक दिवसा पासून वादग्रस्त असलेली वेलंग येथील जि प शाळा शनिवारी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यां च्या उपस्थितीत जमीनदोस्त करण्यातआल्यानंतर रात्री उशिरा वाई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला इमारत पाडल्याच्या कारणास्तव काहीकाळ तणावाचे वातावरण तयार झाले होते परंतु काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वादविवादावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजन केले होते तरीही केंद्रप्रमुख विठ्ठल माने यांनी वरिष्ठांचे कारण पुढेकरत महिला मुख्याध्यापकांची ढाल करून रात्री उशिरा गुन्हा दाखल करत ग्रामस्थांमध्ये नाहकतेढ निर्माण केल्याने वेलंग गावात गढूळ वातावरण तयार झाले आहे. धोम धरण झाल्यानंतर पश्चिम भागातील अनेकगावांना विस्थापित व्हावे लागले होते यामध्ये वेलंग गावालाही झळ सोसावी लागली हाती गावा मधील विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षणघ्यावे लागत होते यातूनच तत्कालीन सरपंच व वेलंग ग्रामस्थांच्या विनंतीला मान देत जेधे कुटुंबियांनी शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली यासाठी कुठल्याही प्रकारे लेखी स्वरूपात बक्षीसपत्र अगर हमीपत्र दिलेले नाही असे जेधे यांचे म्हणणे आहे तरीसुद्धा तत्कालीन सरपंच यांनी जेधे कुटुंबाची फसवणूक करत ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून जागेवर मालकी हक्क दाखल केला. यावरही जेधे कुटुंबाची कुठलीही हरकत नाही परंतु जि. प शाळेची नवीन इमारत झाल्यानंतर सदर वादग्रस्त इमारत मुख्य शाळेपासून जवळपास दीड किलोमीटर लांब आहे तसेच वापरासाठी गेली 35 वर्षांपासून बंद करण्यात आली आहे त्यामुळेच ही इमारत धोकादायक होवून मोडकळीस आली होती शेजारीच जेधे कुटुंबाचे वास्तव असल्याने इमारतीपासून धोका निर्माण झाला होता शाळे मध्ये घाणीचे साम्राज्य तयार झाले होते अनेकदा उंदीर घुशी सर्प विंचू सारखे जिवघेण्या प्राण्यांनी वास्तव केले होते ही बाब पुराव्यानिशी वेलंग ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली होती तरीही ग्रामपंचायत केंद्रप्रमुख व प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेण्यात आला नाही ग्रामपंचायत प्रशासन शिक्षण विभाग व केंद्रप्रमुख यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून अखेर शुक्रवारी शाळा आपोआप पडलेली असताना स्वतःच्या घरात जाण्यासाठी रस्ता करण्याच्या उद्देशाने पडलेली अडचण हटवण्याचा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागला आणि इमारत पाडली अशा खोट्या आरोपाला अंगावर घ्यावे लागले असे राजेंद्र जेधे यांनी सांगितले.
---------------------------
ग्रामपंचायत सरपंच वाई शहरात राहून वेलंग गावचा कारभार हाकत आहेत तर वाई पंचायत समिती प्रशासन ,शिक्षण विभाग व शाळा केंद्र प्रमुखांना शिक्षणाऐवजी राजकारणातच जास्त स्वारस्य असल्याने शिक्षणाच्या आयचा घो असे म्हणण्याची वेळ पालकांवर आली वाई तालुक्यात नुकतीच लगडवडी येथील घटना चर्चेत आली वेलंग येथील वापरात नसलेली धोकादायक शाळा हटवण्यासाठी लेखी पत्र व्यवहार करूनहीकित्येक महिने वेळ मिळत नाही इमारत पडल्यावर मात्र केंद्र प्रमुखासह वेलंग ग्रामपंचायत व स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना खडबडून जाग येते याचे आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे
राजेंद्र जेधे