भोर ! थोर पुरुषांनी उभा केलेल्या विचारांच्या गोवर्धनाचा प्रसार करा : खासदार श्रीनिवास पाटील

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी 
फुले,शाहू ,आंबेडकर यांचे विचारांचा वारसा महाराष्ट्राला लाभला असून थोर पुरुषांनी उभा केलेल्या विचारांच्या गोवर्धनाचा प्रसार शिकून संघटित होत संघर्ष करीत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पुढे नेऊया असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी भोर येथील साहित्य संमेलनात बोलताना केले.
      भोर येथे फुले,शाहू ,आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, अनंतराव थोपटे महाविद्यालय ,अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,महाराष्ट्र साहित्य परिषद ,श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठान तसेच समविचारी संस्था व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दीच्या पार्श्वभूमीवर ८ वे फुले,शाहू, आंबेडकर विचार प्रसार दोन दिवसांचे साहित्य संमेलन दि.२६ नोव्हेंबर सुरू झाले.आमदार संग्राम थोपटे हस्ते ध्वजारोहण करून संमेलनास प्रारंभ करण्यात आला होता.शहरातील एसटी स्टँडवरील संविधान शिल्प ते संमेलन स्थळापर्यंत संविधान रॅली काढण्यात आली होती. यावेळी उद्घाटक झी २४ तास चे मुख्य संपादक निलेश खरे,तहसीलदार सचिन पाटील,पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे तर दुसऱ्या दिवशी दी.२७ उद्घाटक ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी, जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, आमदार लहू कानडे, साहित्यिक डॉ. हरि नरके, संयोजन समिती अध्यक्ष भुजंगराव दाभाडे,कार्याध्यक्ष रोहिदास जाधव,कोषाध्यक्ष ज्ञानोबा घोणे,सहसचिव आनंदा गायकवाड,राजन घोडेस्वार,सल्लागार डॉ.सुरेश गोरेगावकर,डॉ.प्रदीप पाटील ,प्राचार्य प्रसन्नकुमार देशमुख,संतोष घोरपडे,महेंद्र साळुंके,सविता कोठावळे,सुजाता भालेराव तसेच संविधान दिनामित्त विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
To Top