सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला तरी सद्या निवडणूक लागलेल्या गावांमध्ये गावबैठका होऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याकडे कल असल्याने तालुक्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याची चित्र आहे. निवडणुकीसाठी सोमवार दि.२८ पासून उमेदवारी नामनिर्देशन पत्र भरणे सुरू झाल्याने भोर राजवाडा चौक येथील सीएससी व शहरातील खाजगी सायबर कॅफे केंद्रांवर गर्दी होत आहे.निवडणुकीसाठी दोन नोव्हेंबर पर्यंत नामर्देशनपत्र भरले जाणार आहेत.