वाई आगाराची एसटी सुसाट..! एका दिवसात तब्बल १० लाख २१ हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी 
दिवाळी वाई आगाराने एका दिवसात 
१० लाख २० हजार ८२४ रुपये इतके विक्रमी उत्पन्न मिळवून वाई आगाराचा नावलौकिक वाढविला असल्याचे मत आगार प्रमुख गणेश कोळी यांनी व्यक्त केले. 
       वाई आगारातील सर्व पर्यवेक्षक   चालक वाहक कार्यालयीन यांत्रीकी,सुरक्षा रक्षक सफाई कामगार अशा सर्व विभागांच्या अधिकारी, कर्मचारी वर्गाने एकत्रीत येऊन भारतीय संस्कार आणी संकृतीचा पुरातन काळा पासून चालत आलेला वारसा आणी लहाना पासुन आबालवृद्धांचे आकर्षन व   आवडता असणारा  सण म्हणून दिपावली या सणाकडे पाहीले जाते त्या निमित्ताने वाईचे  आगार प्रमुख गणेश कोळी वाहतुक निरिक्षक किरण धुमाळ महिला  सहाय्यक वाहतुक अधिक्षक मुल्ला पोपट निर्मळ वाहतुक नियंत्रक कय्युम शेख .डि. बी. जाधव ए. एल. खरात एस.एन.जाधव .रिझर्वेशन विभागाचे .साधना शिंगारे .अविनाश राजपुरे .हे सर्व अधिकारी आणी कर्मचारी वर्गाने एकत्रीत येऊन दिपावली सणा निमित्त प्रवाशांची येण्या जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून वाई आगारतुन जादा एसटीच्या बसेस सोडुन प्रवाशांची केलेली सोय हि गौरवास्पद आहे.त्याच्यातुन एका दिवसात तब्बल १० लाख २० हजार ८२४ रुपये इतके विक्रमी उत्पन्न मिळवून वाई आगाराचा नावलौकिक  वाढविल्या बद्दल आगार प्रमुख गणेश कोळी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत . आपण सगळे एकत्र आलो तर काय घडु शकते याचे हे उत्तम ऊधारण आहे असे गौरव ऊदगारही आगार प्रमुख यांनी प्रतिनिधीशी बोलताना काढले .
  वाई आगारातुन  सोडलेल्या या जादा  लांब पल्याच्या एसटी बसेसचे  चालक आणी वाहकांच्या अथक परिश्रमा मुळे दिवाळीच्या दिवशी  एका दिवसाचे अधिकचे   उत्पन्न १० लाख २० हजार ८२४ रुपये इतके विक्रमी उत्पन्न मिळविले तर बस स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी रिझर्वेशनची देखील सुविधा उपलब्ध करुन दिली होती येथे नेमणूकीस असणार्या कर्मचारी वर्गाने येणार्या प्रत्येक प्रवाशांना चांगुलपणाची आणी आपुलकीची वागणूक दिल्यानेच येथील एका दिवसाचे तब्बल सव्वा लाख रुपयांचे असे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे .
 वाई आगारातील सर्व अधिकारी आणी कर्मचारी वर्गांच्या घरी दिपावली हा सण कुटुंबा समवेत  साजरा करण्याच्या अपेक्षांना बगल देऊन एसटी हे माझे मंदिर आहे आणी प्रवासी हे दैवत मानून सर्वजण कामावर हजर राहुन विक्रमी उत्पन्न मिळवून वाई आगाराचा नावलौकिक वाढवल्या बद्दल आगार प्रमुख गणेश कोळी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत .
To Top