सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
पुरातन विभागाने संरक्षक म्हणून केलेल्या व पर्यटन आणि वास्तू कलेचा अभ्यास करण्यासाठी दररोज अनेक संशोधक ,अभासक भेट देत असतात अश्या मंदिरात भैरवनाथ देवाचे मूर्तीच्या मागे लावलेली अंदाजे १५ हजाराची पंचधातूंची चांदीचा मुलामा दिलेली प्रभावळ चोरट्याने उखडून पळवली.या चोरीच्या घटनेने किकली गावा सह परिसरात चर्चा आणि भीती व्यक्त होत आहे,भुईंज पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून पथके रवाना केली आहेत,
घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपअधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास हवालदार बापू धायगुडे करत आहेत.