वाई ! प्रकृती अस्वस्थाच्या कारणामुळे खा. शरद पवार उद्याचा 'किसनवीर'च्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम टाळणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
 किसन वीर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ माजी केंद्रिय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते सोमवार (दि. ७) रोजी दुपारी होणार होता. परंतु शरदचंद्रजी पवार यांच्या प्रकृती अस्वस्थाच्या कारणामुळे सदरचा कार्यक्रम रद्द करण्यात आली असल्याची माहिती, किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
किसनवीर व खंडाळा कारखान्यावर सभासदांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासावर परिवर्तन झाले. तदनंतर या दोन्ही कारखान्याची प्रतिमा सुधालेली दिसून येत आहे. खंडाळा कारखान्याचे गळीत सुरू झाले असून हा कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू झालेला आहे. किसन वीर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वो व माजी केंद्रिय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते सोमवार (दि. ७) होणार होता. परंतु शरदचंद्रजी पवार यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे सदरचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात दिलेली आहे. गळीत हंगाम शुभारंभाची तारीख निश्चित झाल्यानंतर सर्वांना कळविण्यात येणार असल्याचेही आमदार मकरंदआबा पाटील यांनी सांगितले आहे.
To Top