बारामती ! सचिन पवार ! सुप्याच्या शेतकऱ्याची बैलजोडी लै भारी....! सेवर-ग्रोवर बैलजोडी स्पर्धेत पटकावला पुणे जिल्हात प्रथम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
पूर्वा केमटेक प्रा. लि. आणि बसवंत गार्डन यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली सेवर - ग्रोवर बैलजोडी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.यामध्ये पुणे जिल्हातील बारामती तालुक्यातील सुपे येथील सुरेश विश्वनाथ चिपाडे यांचा पुणे जिल्हात प्रथम क्रमांक आला असुन महाराष्ट्रात तीसरा क्रमांक मिळवला आहे , महाराष्ट्रातील सर्वच विभागातून शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रत्येकी पाच हजार रोख पारितोषिक व प्रशिस्तीप्रत्रक सन्मानपत्र देण्यात आले आहे , सर्व सहभागी बैलजोडी स्पर्धकांचे पुर्वा कंपनीच्या मार्फत हार्दिक अभिनंदन करण्यात आले ,

   सेवर - ग्रोवर बैलजोडी स्पर्धा शेती जगातील सर्वात मोठा जिवंत रंगमंच असन बळीराजा हा या रंगमंचावरील सर्वोत्कृष्ट कलाकार.काळ्या मातीतून सोनं पिकवणाऱ्या या बळीराजाच्या काबाडकष्टांना साथ देतात ते त्याचे लाडके सर्जा-राजा अर्थातच त्याची बैलजोडी. या सर्जा राजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव बैलपोळा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या बळीराजाशी पूर्वाचेही सलोख्याचे नाते आहे. त्यामुळे त्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पूर्वा केमटेक प्रा. लि. आणि बसवंत गार्डन यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी या सेवर ग्रोवर बैलजोडी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा जिंकल्यानंतर चिंपाडे यांनी पुर्वा स्पर्धा आयोजकांचे आभार मानाले व कृतनता व्यक्त केली व ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करावी अशी विनंतीही केली ,
To Top