लोणंद : प्रतिनिधी
पुणे पंढरपूर पालखी मार्गावर आज सोमवार दि. ०७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाडेगाव पाटी पासून काही अंतरावर वॅगनआर आणि क्रेटा कारची समोरासमोर धडक होवून अपघात झाला आहे. यामध्ये एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लोणंद याठिकाणी दाखल करण्यात आले आहे.
पालखी मार्गावर असलेले खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जखमींना उपचासाठी लोणंद येथे पाठवण्यात आले आहे.