मेढा ! ओंकार साखरे ! नवीन आखलेल्या टाऊन प्लॅन रद्द करावा यासाठी नगरपंचायत समोर रहिवाश्यांचे बोंबाबोंब आंदोलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मेढा : प्रतिनिधी
आज मेढा नगरपंचायत कार्यालया समोर मेढयातील रहिवाश्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. त्यामध्ये नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांना नवीन आखलेल्या टाऊन प्लॅन रद्द करावा यासाठी निवेदन दिले तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यात, एक लाडू दोन लाडू आम्हला उध्वस्त करणाऱ्या सरकार ला खड्यात गाडू. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. अशाप्रकारच्या घोषणा नागरिकांमधून देण्यात आल्या.
            नगरपंचायत स्थापन होऊन पाच वर्षे झाली या काळात बांधल्या गेलेल्या इमारतींच्या अधिकृत नोंदणी अद्याप झालेल्या नाहीत त्यात वाढीव झालेल्या घरपट्टी ने पुरते बेजार झालेले  मिळकत धारक अजून त्या धक्क्यातून सावरले नाहीत आणि त्यात आता हा नवीन टाऊन प्लॅन मुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला दिसला 
या मोर्चामध्ये बोलताना व्यसनमुक्ती चे अध्यक्ष विलास बाबा जवळ यांनी बोलताना सांगितले प्रस्तापित टाऊन प्लॅन आराखडा रद्द करा जुलमी वाढीव घरपट्टी रद्द करायलाच पाहिजेत आमची घरे इमारतींची अधिकृत नोंदणी करायलाच पाहिजे रहिवासी व्यापारी शेतकऱ्यांना न्याय मिळालच पाहिजे आणि या टाऊन प्लॅन साठी अनेक शासकीय इमारती जमिनी आहेत त्या विचारात घ्याव्या अशाप्रकारच्या मागण्या मांडल्या.
                  तसेच या मोर्च्यादरम्यान मेढा शहरातून या कार्याचा निषेध म्हणून रॅली सुदधा काढण्यात आली तसेच टाऊन प्लॅनिंग च्या नकाशा आराखड्याची होळी केली तेव्हा मेढा नगरीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. नगरपंचायत कार्यालयाबाहेर शिवसेनेचे सचिन जवळ व सचिन करंजेकर बोलताना म्हणाले की या सगळ्या आराखड्याचे टाऊन प्लानिंग करत असताना नगरपंचायत मधल्या कुठल्या नगरसेवक नागराध्यक्षांच्या जमिनी दिसल्या नाहीत फक्त आम्हा गरीब शेतकरी जनतेच्या जमिनी दिसल्या यात काही आतील गोष्टी असतील असे वाटते आहे
To Top