सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे बु : प्रतिनिधी
ग्रामपंचायत थोपटेवाडी यांचे वतीने सहकार्याने १४ व १५ वित्त आयोगामधील तरतुदीनुसार, प्रशिक्षण विभाग किशोरवयीन मुली व महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण व ब्युटी पार्लर प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आले आहे. शिवानी टेलरिंग ट्रेनिंग सेंटर थोपटेवाडी व प्रणिता ब्युटी पार्लर ट्रेनिंग सेंटर थोपटेवाडी त्याचे उद्घाटन सरपंच रेखा बनकर व उपसरपंच राणी पानसरे यांच्या हस्ते संपूर्ण झाला. पहिल्याच दिवशी ६० महिलांची या प्रशिक्षणासाठी नोंदणी झाली.
महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी शिलाई मशीनचे ब्युटीशियनचे कौशल्य शिकून आत्मनिर्भर व्हावे... स्वतःच्या कुटुंबातील हातभार लावावा. त्यांनी तयार केलेला कपडे चे मार्केटिंग ग्रामपंचायत महिला अस्मिता संघामार्फत केले जाईल. असे सरपंच रेखा बनकर यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव कोरडे , सीमा थोपटे, संतोष खांडेकर, राणी पानसरे, शुभांगी आडागळे. रिटायर कॅप्टन जयवंत थोपटे, पोलीस पाटील नितीन थोपटे, यशवंत थोपटे सचिन आडगळे, तुषार थोपटे बबन पानसरे उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालिका अनिता प्रमोद पानसरे यांनी केले तर स्वागत प्रणिता सागर घाटे यांनी केले.