सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर - वेल्हा -मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भरविण्यात आलेल्या अनंत चषक २०२२ कुस्ती आखाड्यात चुरशीच्या कुस्त्या सुरू असून हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या ठरत आहेत.
आमदार थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील सात दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले तसेच ७ नोव्हेंबर अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी भोर - वेल्हा - मुळशीतील १० ते १५ हजार नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.सद्या कुस्ती मैदानात चुरशीच्या कुस्त्या सुरू असून मैदान कुस्ती शौकिनांनी खचाखच भरले आहे.