सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
वाई येथील सिद्धनाथवाडीत चोरी चुपके मटक्याचा धंदा तेजीत सुरु असल्याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना खास खबर्या मार्फत समजली होती .त्या वर धाड टाकण्याचे आदेश डिबी पथकाला दिले होते .या पथकाने तातडीने सिद्धनाथवाडीत जाऊन सापळा लावुन मटक्याचा अड्डा चालवणारा बाळकृष्ण माने याला काही कळण्या अगोदरच त्याच्या वर झडप घालुन ३८ हजार रुपये रोख रकमेसह मटक्याचे साहित्य आणी १० हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकुण ४८ हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करुन माने यास पथकाने ताब्यात घेऊन त्यास वाई पोलिस ठाण्यात आणुन त्याच्या वर रितसर गुन्हा दाखल केला आहे .अचानक झालेल्या या कारवाई मुळे अवैद्य धंदे करणार्यान मध्ये खळबळ उडाली आहे . वाई शहरात अवैद्य चोरी चुपके सुरु असलेल्या धंद्यांची माहिती वाई पोलिसांना दिल्यास ते ऊध्दस्त करण्यास
वाई पोलिस तत्परतेने पुढे येतील असे आवाहन
बाळासाहेब भरणे यांनी केले आहे .
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नुकतेच सातारा जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेले समीर शेख यांनी जिल्ह्यातील शहरे आणी ग्रामीण भागातील गावा गावांन मध्ये विना परवाना सुरु असलेले अवैद्य धंद्यानवर धाडी टाकुन कुणाचीही पाठराखण न करता त्यातील असणार्या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळुन त्यांच्या वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत .या आदेशाचे पालन करत वाई शहरातील सिद्धनाथवाडी येथील रहिवासी असलेला बाळकृष्ण माने वय ५४ हा त्याच्या राहत्या घराच्या समोर असणार्या कंपाउंड मध्ये चोरी चुपके मटक्याचा अड्डा चालवतो अशी माहिती पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना प्राप्त
होताच त्यांनी डिबी पथकाचे प्रमुख असलेले हवलदार विजय शिर्के महिला पोलिस हवलदार सोनाली माने किरण निंबाळकर श्रावण राठोड अमीत गोळे प्रसाद दुदुस्कर यांना बोलावुन सिद्धनाथवाडी वाडी येथील मटका अड्यावर छापा टाकण्याचे आदेश दिले होते .
दिलेल्या आदेशाचे पालन करत डिबी पथकाने
सिद्धनाथवाडीत जावुन माने याची माहिती काढुन तो राहत असलेल्या घर परिसरात हे पोलिस पथक सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सापळा लावुन बसले असता त्या ठिकाणी असणार्या कंपाउंड मध्ये अनेक लोक मटका लावण्यासाठी ये जा करीत असल्याची खात्री झाल्यावर पथकाने मटका अड्डा चालविणारा बाळकृष्ण माने याच्या वर झडप टाकुन रंगे हात पकडून त्याच्या कडून तब्बल ३८ हजार रुपये रोख रकमेसह एक १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणी मटका चालविण्यास लागणारे सर्व साहित्य असे ४८ हजार रुपये जप्त करुन आरोपी ताब्यात घेऊन त्यास वाई पोलिस ठाण्यात आणुन त्याच्या वर गुन्हा दाखल दाखल केला आहे .या धडाकेबाज कारवाईचे वाई शहरातील महिला वर्गांनी स्वागत केले आहे .या मटक्याच्या व्यवसाया मुळे अनेक महिलांचे प्रपंच ऊध्दस्त झाले होते .