सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
अंदोरी ता खंडाळा गावामध्ये चोरटयांनी धुमाकुळ घातला असुन शुक्रवारी रात्री चोरटयानी एक कृषीसेवा केंद्र व जिल्हा परिषद शाळेमध्ये चोरी करुन ३६६०० रुपयाचे शालेय साहित्य चोरून नेले आहे. १५ दिवसापुर्वी देखील चोरटयांनी पोस्ट ऑफिस, सावतामहाराज मंदीर, तलाठी कार्यालयासह गावातील वेगवेगळी सुमारे ८ दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला होता. तर काही दुकाने फोडुन साहित्याची चोरी चोरटयानी केली होती. चोरीच्या या घटनेमुळे अंदोरी गावात खळबळ उडाली आहे.
अंदोरी गावामध्ये १५-२० दिवसापासुन चोरटयांनी धुमाकुळ घातला आहे, शुक्रवारी रात्री या अज्ञात चोरट्यांनी जिल्हा परिषद अंदोरी केंद्र शाळेतुन तीन संगणक संच, सीसीटीव्ही कॅमऱ्याचा डिव्हीआर, दोन टॅब, क्रिडा साहित्य आदी ३६६०० रुपये किंमतीच्या साहित्याची चोरी केली आहे, तर भिकु ननावरे यांच्या कृषी सेवा केंद्र फोडुन काही रोकड चोरी केली आहे. १५ दिवसापुर्वी देखील अज्ञात चोरट्यांनी पोस्ट ऑफिस, सावतामहाराज मंदीर, तलाठी कार्यालय फोडले होते. तर
बाळासो शेख, सुधीर बोडके, भरत सागर ,भिकु ननावरे, कांतिलाल धायगुडे,अभिजित दगडे,शुभम पवार आदी व्यावसायिकांची दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला होता. तर काही दुकाने फोडुन साहित्याची चोरी चोरटयानी केली होती. चोरीच्या या घटनेनंतर लोणंद पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असुन जिल्हा परिषद शाळेच्या चोरीची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे