सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त लोकसेवक कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश मिसाळ यांच्या वतीने ऊसतोड कामगारांना मोफत स्वेटर जर्किंग कान टोपी व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त लोकसेवक श्री रुपेश मिसाळ कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष (आठवले) यांनी ऊसतोड कामगारांना ऐन थंडीच्या वातावरणा मध्ये कामगारांच्या जीवनावश्यक वस्तू म्हणून त्यांना स्वेटर ,ब्लॅंकेट, जर्किंग ,कानटोपीचे वाटप करण्यात आले . त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमांचे वाई तालुक्यात कौतुक होत आहे .
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले अशोक गायकवाड यांनी कामगारांना संबोधित करत असताना त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले सोबत लोकसेवक रुपेश मिसाळ यांच्या माध्यमातून सदैवच सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम घेण्यात यावेत व त्या उपक्रमासाठी सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असे मत बापूंनी व्यक्त केले सदर कार्यक्रमास युवा नेते स्वप्निल गायकवाड, वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा अध्यक्ष संतोष गायकवाड, वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष कालिदादा घाडगे, सागर शिंदे, शहर अध्यक्ष बाजीगर इनामदार, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, खरेदी-विक्री संघाचे माझी चेअरमन शिवाजीराजे पिसाळ, गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तम भोसले, माजी सरपंच आप्पासाहेब पिसाळ, विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन मोहन पिसाळ, सोबत रामदास पिसाळ, शनि मिसाळ, बजरंग भानसे, निवास भानसे, महेंद्र मिसाळ, संजय मिसाळ, सागर कांबळे, संजय घाडगे, दिलीप मालुसरे, सुरज कांबळे, किरण मिसाळ, आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते .