वाई बिग ब्रेकींग ! दौलतराव पिसाळ ! घराशेजारी शाळेची अडचण होत होती, म्हणून रातोरात शाळा केली जमीनदोस्त : दंडेलशाहीचा आरोप करत ग्रामस्थांची पोलीस ठाण्यात धाव ! वेलंग येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
 वेलंग ता. वाई येथील रहिवासी असलेले  राजेंद्र संपत जेधे यांनी वेलंग गावातील प्राथमिक शाळा जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त  केली आहे, त्य़ातील शाळेच्या साहित्याचे नुकसान झाले असून त्य़ांच्य़ानविरोधात वेलंग गावचे सरपंच  विद्या निलेश  पवार उपसरपंच संजय आनंदराव सूर्यवंशी व शाळा समितीचे अध्यक्ष अमोल शामराव गोळे व सर्व सदस्य  ग्रामस्थ यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप, गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांच्याकडे तक्रार केली असून लेखी निवेदन दिले आहे, तसेच वाई पोलीस ठाण्यात राजेंद्र जेधे यांच्य़ा दंडेलशाहीच्य़ा विरोधात  तक्रार दाखल  केली आहे,
         वेलंग गावातून मिळालेली माहिती अशी कि, शाळेची जागा त्यांची असल्य़ाचा दावा त्यांनी केला असून आठ /अ च्य़ा उतारयावर मात्र शाळेचेच  नाव आहे, शाळेच्य़ा बाजूलाच ते राहत असल्य़ाने झाळेची त्यांना अडचण होत होती, शाळेची जागा त्याच्या  पूर्वजांनी ४० वर्षांपूर्वी गावाला शाळा बांधण्य़ा साठी दिलेली आहे, त्यामुळे त्यांच्या या जागेवर कसलाही अधिकार नसताना निव्वळ 
वैयक्तिक स्वार्थापोटी   शाळेची खोली शनिवारी सकाळी ११ वाजता जेसीबीच्य़ा सहाय्याने  पाडून ती जागा मोकळी केली आहे,  प्राथमिक शाळेची खोली जरी जुनी झाली असली तरीही त्यात शाळेचे साहित्य  ठेवले जात होते, जिल्हा परिषद लवकरच नवीन खोली बांधणार होती, सर्व गावाचा विरोध असताना दंडेलशाही करून शाळेची खोली
पाडण्यात आली आहे, याला ग्रामस्थांसह सरपंच, उपसरपंच, व शाळा समिती यांचा तीव्र विरोध असून राजेंद्र जेधे यांच्य़ा विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्य़ाचे दिलेल्य़ा प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, तसेच याची वाई पोलीस ठाण्य़ात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास वाई 
पोलिस  करीत आहेत . निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य  दीपक जेधे, शुभांगी राऊत, दत्तात्रय जेधे, लक्ष्मी
गुळूंबकर, कृष्णदेव जाधव यांच्य़ासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत .
To Top