सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथून रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजाराने खरेदी करून विकणाऱ्या दुकानदारास व ट्रक चालकाला वडगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
संतोष जवाहरलाल शहा (वय:५१) रा. वडगाव निंबाळकर तालुका: बारामती व ट्रक चालक किशोर एकनाथ सावंत (वय४१) रा.लिंब.सातारा या दोघां विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक मधून दोन लाख ६६ हजार ८५० रुपयांचा ३२५ नायलॉनच्या पिशव्यात असलेला माल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल पोपट नाळे यांनी या दोघांना विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.